अन्नदाता ते उर्जादाता शेतकरी
भारत सरकारने 2023 पासून 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे उद्दिष्ट (ज्याला E20 देखील म्हटले जाते) वाढविले आहे. E20 एप्रिल 2023 पासून लागू केले जाईल.
भारतात सध्या ८.५ टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जाते. लवकरच ह्यात वाढ करून ते १० टक्के करण्याचा प्रस्ताव आहे व पुढे जाऊन ते प्रमाण टप्प्याटप्प्याने २० टक्के केले जाईल .आता हे सरकार का करताय त्याच मुख्य कारण म्हणजे आपली दरवर्षी वाढत जाणारी कच्या तेलाची आयात .दरवर्षी साधारणतः २० लाख कोटी रुपयांचं कच्च तेल आपण आयात करतो,आणि हि आकडेवारी दिवसेंदिवस वाढत वाढत जात आहे. त्यावर काही प्रमाणात कपात करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.सध्याच्या घडीला केल्या जाणाऱ्या इथेनॉल ब्लेंडींग मुले जवळपास ४००० कोटी रुपये च इम्पोर्ट कमी होत आहे .पण ह्याचबरोबर इथेनॉल ची गरज सुद्धा वाढत आहे त्यामुळे केंद्र सरकारने साखर कारखान्यांना जास्तीत जास्त इथेनॉल निर्मिती वर भर द्यायला सांगितले आहे.ह्यांच्यामुळे दोन फायदे होतील एक तर साखर कारखान्यांचा अतिरिक्त साखरेचा प्रश्न सुटेल सोबतच कारखायचे आर्थिक स्थिती सुधारण्यास हि मदत होईल ,आणि ह्याचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होईल कारण ह्यामुळे साखरेची मागणी कमी असली तरी ऊस पुरवठा कायम राहील .लवकरच सरकार आणि ऑटोमोबाईल कंपनी मिळून १००% इथेनॉल वर चालणाऱ्या गाड्या बाजारात आणत आहेत. या गाड्यांमध्ये जे एंजिन वापरले जाते त्याला फ्लेक्स एंजिन असे म्हणतात म्हणजे यात तुम्ही १००% पेट्रोल किंवा १००% इथेनॉल दोन्हीपैकी काहीही वापरू शकतात , आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यामुळे गाडी ची किंमत आहे तितकीच राहील. काही दिवापूर्वीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन जी गडकरी ह्यांनी टोयोटो ह्या कंपनीची १००% इथेनॉल वर चालणारी गाडी लाँच केली (Toyota Corolla Altis FFV-SHEV).अश्याच येत्या काही महिन्यात बजाज,टीव्हीएस ह्यांच्या देखील १००% इथेनॉल वर चालणाऱ्या २ व्हिलर आणि ३ व्हिलर सुद्धा बाजारात येतील असेही त्यांनी सांगितले . म्हणजे लवकरच आपण पेट्रोल ऐवजी आपल्या शेती पासून तयार होणाऱ्या इथेनॉल वरती आपल्या गाड्या चालवू ह्यात काही शंका नाही. आता मुख्य मुद्धा आहे तो कारखाण्याच्या अर्थकारणाचा, तर सध्या साखर उत्पादन मधून कारखाने तितकेसे फायदा कमवू शकत नाही ह्याचे एक कारण म्हणजे शेतकऱ्याने ऊस कारखान्यात घातल्यावर १५ दिवसाच्या आत FRP ची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणे अनिवार्य आहे. साहजिकच सगळ्याच कारखान्याकडे इतके पैसे सुरुवातीलाच असतील असे नाही .मग FRPची रक्कम देण्याकरिता कारखाने कर्ज काढतात मग त्याचे व्याज आणि मुद्दल वर्षभर साखर विकून फेडतात . ह्यात जर जागतिक बाजारात साखरेचे बाजार कोसळले तर मग आणखीन अवघड होऊन जाते . इथेनॉल उत्पादनामुळे कारखान्यांना एक स्थिर उत्त्पन्न चा मार्ग राहतो . दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशात होणारे साखरेचे अधिकचे(SURPLUS) उत्पादन,उदाहरण घायचे तर मागच्या वर्षी आपल्या देशात एकूण साखर उत्पादन हे जवळपास ३१० लाख मेट्रिक टन .इतके होते आणि आपल्या देशाची गरज आहे २४० लाख मेट्रिक टन म्हणजे जवळपास ७० लाख मेट्रिक टन इतकी साखर आपल्याकडे अधिकची तयार झाली आता साहजिकच हि साखर आपण निर्यात करतो पण आपण जगात काय एकटेच नाही साखर उत्पादन करणारे , ब्राझील हा सुद्धा साखर उत्पादनात अग्रेसर असणारा देश आहे मागच्या वर्षी तिकडे दुष्काळ पडला म्हणून आपल्याइकडे शेतकऱ्याच्या तोंडावर हसू होते.दरवर्षी अशी परिस्थती होईल असे नाही .त्यामुळे साखर उत्पादन कमी करून इथेनॉल उत्पादन वाढवणे हेच जास्त फायद्याचे ठरेल,ब्राझील मध्ये जेव्हा कच्च्या तेलाचे भाव वाढतात तेव्हा ते इथेनॉल च उत्पादन वाढवतात आणि भाव उतरले कि साखर उत्पादन वाढवतात अशीच काहीशी पद्धत भारतात सुद्धा असायला हवी तेव्हा कारखान्याचे आणि पर्यायाने ऊस उत्पादक शेतकऱ्याचे अर्थकारण बदलेल.
दुसरा मुद्दा म्हणजे आजकाल जे पेट्रोल जे भाव वाढतात त्याला ना केंद्र सरकार जबाबदार आहे ना राज्य सरकार कारण हे सगळं ठरत ते जागतिक कच्च्या तेलाचे बाजारभावावर.याउलट इथेनॉल पूर्णतः आपल्याकडे तयार होते आणि शिवाय ते हरित इंधन आहे त्यामुळे प्रदूषण कमी. सगळ्यात महत्वाचे पेट्रोल चा भाव आहे जवळपास ११० रुपये/लिटर आणि इथेनॉल चा भाव आहे ६५ रुपये/लिटर,म्हणून जेवढ्या लवकर आपण पेट्रोल ऐवजी इथेनॉल वर येऊ तितके जास्त फायद्याचे आहे .आणि केवळ ऊस च नव्हे तर गहू ,मका,तांदूळ अश्या अनेक पिकापासून देखील इथेनॉल तयार करता येते,आपण अनेकदा पाहतो गोदामात गहू,तांदूळ वापराविना सडून जातात त्याऐवजी जर का इथेनॉल निर्मिती केली तर नक्कीच फायदा होईल .
तरी ह्या सर्व गोष्टीसाठी सर्व साखर कारखाने , राज्य आणि केंद्र शासन आणि एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे . मान्य आहे हे इतके सहज होऊ नाही शकत पण जितक्या लवकर होईल तितके फायद्याचे आहे . म्हणूनच आपल्या आजच्या ह्या ब्लॉग ची हेडिंग आहे अन्नदाता ते उर्जदाता शेतकरी .आपला शेतकरी हा आत्ता केवळ अन्नदाता राहिला नसून तो आता उर्जदाता देखील झाला पाहिजे. #MinistryofRoadandTransport #NitinGadkari #Ethanolblending #FlexFuel
Very informative & proud thing farmers Power 💪🌾
ReplyDelete