Posts

अन्नदाता ते उर्जादाता शेतकरी

Image
भारत सरकारने 2023 पासून 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे उद्दिष्ट (ज्याला E20 देखील म्हटले जाते) वाढविले आहे. E20 एप्रिल 2023 पासून लागू केले जाईल.           भारतात सध्या ८.५ टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जाते. लवकरच ह्यात वाढ करून ते १० टक्के करण्याचा प्रस्ताव आहे व पुढे जाऊन ते प्रमाण टप्प्याटप्प्याने २० टक्के केले जाईल .आता हे सरकार का करताय त्याच मुख्य कारण म्हणजे आपली दरवर्षी वाढत जाणारी कच्या तेलाची आयात .दरवर्षी साधारणतः २० लाख कोटी रुपयांचं कच्च तेल आपण आयात करतो,आणि हि आकडेवारी दिवसेंदिवस वाढत वाढत जात आहे. त्यावर काही प्रमाणात कपात करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.सध्याच्या घडीला केल्या जाणाऱ्या इथेनॉल ब्लेंडींग मुले जवळपास ४००० कोटी रुपये च इम्पोर्ट कमी होत आहे .पण ह्याचबरोबर इथेनॉल ची गरज सुद्धा वाढत आहे त्यामुळे केंद्र सरकारने साखर कारखान्यांना जास्तीत जास्त इथेनॉल निर्मिती वर भर द्यायला सांगितले आहे.ह्यांच्यामुळे दोन फायदे होतील एक तर साखर कारखान्यांचा अतिरिक्त साखरेचा प्रश्न सुटेल सोबतच कारखायचे आर्थिक स्...